पिण्याचे पाणी
१)साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे होतात .
२)पाण्यात एकदा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात .
३) 'जलसंजीवनी ' हे उपयुक्त द्रावणांचे एक उदाहरण आहे .
४)सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात .काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतात .
५)तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात ,तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात .
६)गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात .
प्रश्न २)चूक की बरोबर ते सांगा
१)तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही .
उत्तर - चूक
२)पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत .
उत्तर - चूक
३)गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो .
उत्तर - बरोबर
४)खोडरबर पाण्यात तरंगते .
उत्तर - चूक
५)चहा गाळून त्याचा चोथा वेगळा करता येतो .
उत्तर - बरोबर
प्रश्न ३ .खालील प्रश्नांची उत्तरे द्या .
१)लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थाचे द्रावण आहे ?
उत्तर -लिंबाचे सरबत लिंबाचा रस ,साखर , मीठ या पदार्थाचे पाण्यात केलेल्या मन असते .
२)पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले ,तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही .याचे कारण काय ?
उत्तर - स्वच्छ पाण्यातही अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात .असे पाणी पोटात गेल्यास आजार होऊ शकतात म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही .
३)सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो ?
उत्तर - सर्वात करताना त्यातील साखर आपण चमच्याने ढवळतो त्यामुळे ती लवकर विरघळते .
४)तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते ?
उत्तर - तेल पाण्यावर तरंगते .
प्रश्न ४ .पाणी पारदर्शक कसे होते ?
उत्तर - जेव्हा आपण गढूळ पाण्यावर तुरटी फिरवितो तेव्हा तुरटीचे कण पाण्यात पसरतात या कणांना मातीचे बारीक कण चिकटतातते सर्व वजनाने जड असतात मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात असे पाणी पारदर्शक दिसते .