सजीवांचे परस्परांशी नाते
१) पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम मिळतो .
२)आपल्या गरजा काही पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो .
३)वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो .
४)काय करते हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतु असेही करतात .
प्रश्न २) पुढील प्रश्नांची उत्तरे द्या .
१)वनस्पतींचा आपणास कोण कोणता उपयोग होतो ?
उत्तर - वनस्पती कडून आपल्याला फळे-फुले , पालेभाज्या, अन्नधान्य इत्यादी मिळतात .फुलांचे आणि फळांचे वेगवेगळे उपयोग होतात .कापड बनवण्यासाठी कापूस लागतो तोही आपल्याला वनस्पती कडून मिळतो .माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते ऑक्सिजन ही वनस्पती कडून मिळतो .
२)वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात ?
उत्तर - स्वतःच्या जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणारे प्राणी म्हणजे वृक्षवासी प्राणी होय उदा . माकडे , खारी .
३)मार्च महिना सुरू झाला की , झाडांमध्ये काय बदल होतो ?
उत्तर -मार्च महिन्याच्या सुरुवातीला झाडांना नवीन पालवी फुटते .झाडांवर तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात .
प्रश्न ३)विचार करा .
१)शेतात पीक उभे आहे .अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पिक सडून जाते .त्याचे कारण काय असेल ?
उत्तर - शेतात पाणी साचल्यावर पिकांची मुळे कुजून रोपे सडू लागतात .पावसामुळे दाणे गळून पडतात .त्यामुळे सडण्याची क्रिया अधिक वेगाने होते .
२)एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी शेते का पिकत नाही ?
उत्तर - पिकांच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते .पाऊस कमी पडल्यावर पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे रोपे जोमाने वाढत नाही .
३)धामण हा एक सापाचा प्रकार आहे . तो शेताच्या आसपास का राहत असेल ?
उत्तर -धामण हा बिनविषारी आकाराने मोठा असलेला साप आहे .साप उंदीर खातो त्यामुळे तो शेताच्या आसपास धान्य खाणाऱ्या उंदराला खायला धामण शेताच्या असतात राहते .
४)बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील ,तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील का विरळ ?त्याचे कारण काय असेल ?
उत्तर -बर्फ असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात त्यांचे थंडीपासून रक्षण होते अंगातील ऊब टिकून राहते .
प्रश्न ४ .माहिती मिळवा .
१)महाराष्ट्रात पुढील ठिकाणी कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे ?
१)नागपूर - संत्री
२)घोलवड - चिकू
३)सासवड - अंजीर
४)देवगड - आंबा
५)जळगाव - केळी .