साठवण पाण्याची
१)पाणी कशासाठी साठवायचे ?
उत्तर -पाणी ही एक सजीवाची महत्त्वाची गरज आहे .ती एक नैसर्गिक संपत्ती आहे .आपल्याला मिळणारे पाणी पावसा पासूनच मिळते पाऊस हा ठराविक काळच पडतो पाऊस संपून गेल्यावर आपल्याला पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवायचे .
२)पारंपारिक पद्धतीने घरात पाणी कसे साठवत असत ?
उत्तर - जुन्या काळात बाहेरील अंगणात आड जात असत .या झाडांना वर्षभर पाणी असे .पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग होईल अशाप्रकारे पारंपारिक पद्धतीने घरात पाणी साठवत असत .
३)धरण कशावर बांधतात ?
उत्तर - धरण नदीवर बांधतात .
४)पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ?
उत्तर -पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे .तिचा वापर करताना काटकसरीने केला पाहिजे .पाणी सांगणार नाही वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी .विनाकारण पाण्याची नासाडी होणार नाही याकडे लक्ष द्यावे .
५)पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ?
उत्तर -पाण्याचा दर्जा घसरला म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय .पाणी पिण्या योग्य न राहणे
कारखान्यातील सांडपाणी दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते .
प्रश्न २)पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे
साठवता येईल , याचा विचार करा .त्यासाठी काय करता येईल ते सुचवा .
उत्तर -पाणीटंचाई असलेल्या भागात घरातील मोठी भांडी पाण्याने भरून ठेवणे पाण्याचा काटकसरीने वापर करणे .त्या परिसरातील विहिरी ,तलाव बांधणे .
प्रश्न ३)पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात ?
उत्तर -विनाकारण पाणी न सांडणे .विनाकारण पाणी वाया जात असेल तर त्याची माहिती मोठ्या माणसांना सांगणे .घरातील कामे करताना विनाकारण नळ चालू ठेवणार नाही .