शिवरायांचे शिक्षण
१.शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते.
२.मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात .
३.दादाजी कोंडदेव हे कोंढाण्याचे सुभेदारही होते .
४.शहाजीराजांच्या आदेशाने दादाजी कोंडदेव यांनी जिजाऊ व शिवराय यांना पुण्यात
राहण्यासाठी लाल महाल नावाचा मोठा वाडा बांधला .
५.शहाजीराजांच्या शत्रूंनी पुणे जहागीर उजाड करून टाकली होती.
प्रश्न२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा
१.शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणुक कोणी व कोठे केली ?
उत्तर - शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर येथे शिक्षकांची नेमणूक केली .
२.शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विदया शिकवण्यास प्रारंभ केला ?
उत्तर -- शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे,कुस्ती खेळणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे इत्यादी विदया शिकवण्यास प्रारंभ केला .
३.दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट का दिली ?
उत्तर - शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी, म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना
साऱ्याची सूट दिली .
४.शहाजीराजांनी बंगळूरहून शिवरायांबरोबर निरनिराळे अधिकारी का पाठवले होते ?
उत्तर - शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रितीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी बंगळूरहून शिवरायांबरोबर निरनिराळे अधिकारी पाठवले होते .
प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
१.पुण्याचे रुप कसे पालटले ?
उत्तर - जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर लोकांना मोठा धीर आला .जिजाबाईंनी त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोकपुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले.जिजाबाईनी पडकी मंदीरे दुरुस्त करून घेतली, त्यामुळे सकाळ- संध्याकाळ देवपूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रुप पालटले.
२.शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या ?
उत्तर -उत्तम कारभार कसा करावा. शत्रुशी गनिमी काव्याने युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे . घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी;तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विदया शिवरायांना अवगत झाल्या .
३.जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता ?
उत्तर - शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही . तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखी करील, असा जिजाबाईंनी निश्चय केला होता .