साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
बादशहाच्या हातावर तुरी दिल्या

प्रश्न १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

१) शिवराय बादशाहाच्या दरबारात गेले ;त्या दिवशी औरंगजेब बादशाहाचा
             पन्नासावा      वाढदिवस होता .

२) आग्ऱ्याहून येताना सभाजीराजांना        मथुरेत              एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.

३) कैदेतून निसटून शिवराय           राजगडावर         सुखरूप पोहोचले .

४) शिवराय                       जयसिंगच्या            शब्दावर विश्वास ठेवून आग्ऱ्यास बादशाहाच्या भेटीस गेले .

प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा.

१ ) आग्ऱ्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला ?
उत्तर -आग्ऱ्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या हाती सोपवला .

२ ) आग्ऱ्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले ?
उत्तर -आग्ऱ्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे
सेवक आणि संभाजीराजे राहिले .

३ ) आजार बरा व्हावा  ; म्हणून शिवरायांनी काय केले ?
उत्तर -आजार बरा व्हावा ;म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवावयास सुरुवात केली .

४ ) कोणते कारण सांगून हिरोजी व मदारी कैदेतून निसटले ?
उत्तर -' महाराजांचे औषध आणायला जातो,' असे सांगून मदारी व हिरोजी कैदेतून
 निसटले .

प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

१) शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली ?
उत्तर - कैदेत शिवरायांनी आजारी असल्याचे सोंग केले .आजार बरा व्हावा ;म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली .पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत ; पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहीनासे झाले . ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजीराजे पेटाऱ्यांतून पसार झाले .

२ ) कैदेतून सुटल्यावर शिवराय व संभाजीराजे राजगडावर कसे पोहोचले ?
उत्तर -कैदेतून सुटल्यावर शिवरायांनी संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देतशिवराय राजगडावर पोहोचले . पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजेही राजगडावर सुखरूप पोहोचले .

1 Comments

Previous Post Next Post