४.पाणी किती खोल?
स्वाध्याय
प्रश्न १ . एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) म्हशीला काय चावता येत नव्हते ?
उत्तर - म्हशीला कडबा चावता येत नव्हता .
२) पाणी कमी आहे , असे कोणाचे म्हणणे होते ?
उत्तर - पाणी कमी आहे , असे बैलकाकांचे म्हणणे होते .
३) झाडावरून कोण हाक मारत होते ?
४) खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली ?
उत्तर - खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली ; कारण नदीला खूप पाणी होते .
५) नदी पार केल्यावर रेडकाने काय केले ?
उत्तर - नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले .
प्रश्न २ . कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा .
१) " आता मी खरंच म्हातारी झालीय . "
उत्तर - असे म्हैस रेडकाला म्हणाली ; कारण तिला कडबा चावता येत नव्हता .
२) "गुडघ्याइतकंच तर पाणी आहे . आरामात जाशील . "
उत्तर - असे बैल रेडकाला म्हणाला ; कारण बैलाच्या मते नदीत कमी पाणी होते .
३) " वाहून जाशील . मागं फिर . "
उत्तर - असे खारुताई रेडकाला म्हणाली ; कारण खारुताईच्या मते नदीत खूप पाणी होते .
४) " मग तुला घाबरायचं काय कारण ? "
उत्तर - असे म्हैस रेडकाला म्हणाली ; कारण रेडकू खारुताईपेक्षा मोठा व उंच होता .
५) " मला सहज जाता येईल . "
उत्तर - असे रेडकू स्वतःशीच म्हणाले ; कारण म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता.
प्रश्न ३ . जोड्या जुळवा उदा . कडबा - पेंढी
अ ' गट ' ब ' गट
अ) लाकडाची १) मोळी
आ) मेथीची २) जुडी
इ) पुस्तकांचा ३) गठ्ठा
प्रश्न ४) रेडकूची गोष्ट तुमच्या शब्दांत सांगा .
उत्तर -
म्हैस म्हातारी झाल्यामुळे तिला कडबा चावता येत नव्हता म्हणून तिने आपल्या नातवाला नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवरून रेडकूला कडबा कापून आणायला सांगितला . नदीच्या पाण्याचा मोठा आवाज ऐकून रेडकू घाबरले . बैलकाका नदीजवळ चरत होते . बैलकाका रेडकूला म्हणाले , नदीला पाणी माझ्या गुडघ्याइतकंच आहे घाबरू नको आरामात जाशील . पण खारूताई रेडकाला म्हणाली , कालच माझी मैत्रीण वाहून गेली . पाणी जास्त आहे .मागे फिर .
रेडकू गोंधळूण गेले . ते माघारी आले . तेव्हा त्याला म्हातारी म्हैस म्हणाली - सकाळीच गाढवदादा नदी पार करून आला बैलकाका उंच आहे नि खारुताई बुटकी आहे . तू खारूताईपेक्षा मोठा व उंच आहेस . तू घाबरू नकोस .