साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
बोलणारी नदी 
        

प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)लीलाला कसली हौस होती ?
उत्तर - लीलाला खोड्या करण्याची हौस होती .

२)लीला ला काय खायचे होते ?
उत्तर - लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता .

३ )नदी बाई कोणा कोणा पेक्षा मोठी होती ?
उत्तर - नदीबाई ताई ,आई व माईपेक्षा मोठी होती .

४)आईने पेढ्यांचा डबा को ठेवला होता ?
उत्तर - आईने शिंकाळ्यावरच्या बुट्टीत पेढ्यांचा डबा ठेवला होता .

५)पेढा घेऊन लीला कोठे गेली ?
उत्तर -पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली .



प्रश्न २ .कोण कोणाला म्हणाले ?
१) " नको बुडवून शाळा "
उत्तर - असे लीलाची ताई लीलाला म्हणाली .

२) " काय खाऊ आणलास ? "
उत्तर - असे लीला भोला मामांना म्हणाली .

३) " तू बदामी पेढे नदीत टाकलेस ! "
उत्तर - असे आई नीलाला म्हणाली .

४) " काय गं लीला ,नदी तुझ्याशी बोलते ? "
उत्तर - असे लीलाची आजी लीलाला म्हणाली .



प्रश्न ३ .पुढील शब्दांचे अनेक वचन करा .
१)डबा - डबे

२)नदी - नद्या

३)दिवस - दिवस

४)बैल - बैल

५)डोळा -डोळे

६)पेढा - पेढे

प्रश्न ४ .दोन अक्षरी शब्द - ' गळा ' तीन अक्षरी शब्द - ' घोटाळा ' चार अक्षरी शब्द - 'घळा घळा 'यांसारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा .
उत्तर - १)दोन अक्षरी शब्द - काळा , निळा ,
 पोळा , गोळा .

२)तीन अक्षरी शब्द - पिवळा , ढवळा ,कावळा , सावळा .

३)चार अक्षरी शब्द - चळवळा घळघळा,कळवळा ,खुळखुळा .

प्रश्न ५ .या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारी पुढील वाक्य वाचा .
१)रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे . (वावर -शेत )
२ )सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो . (वावर - वर्दळ ये-जा )

याप्रमाणे दोन अर्थ सांगणारे पाच शब्द शोधा प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ दाखवणारी वाक्य लिहा .
१)माझे नाव राजवीर आहे . (नाव - नाम )
१)आम्ही नावेत बसून नदीत हिंडलो . (नाव - होडी )

२)सीमाने लाडू चा गोळा बनवला . ( गोळा - गोल )
२)शाळेत मुले गोळा झाली . ( गोळा - जमा )

३)आम्ही धडा वाचला . ( धडा - पाठ )
३)रामने चांगलाच धडा शिकवला .  ( धडा - शिकवण )

४)राहुलला खाऊ आवडतो . ( खाऊ -पदार्थ )
४)सगळे मिळून खाऊ . ( खाऊ - खाणे )

५)छान हवा आहे . ( हवा - वारा )
५)मला डब्बा हवा आहे . ( हवा -पाहिजे ) .

Post a Comment

Previous Post Next Post