१.शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्
१ . शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ मध्य युगाचा होता .
२ . शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले .
3.आपल्याला शिवाजी महाराजांची थोर कामगिरी पाहून प्रेरणा व स्फूर्ती मिळते.
प्रश्न २ . योग्य जोड्या लावा
विजयनगरचा सम्राट - कृष्णदेवराय
मुघल सम्राट - अकबर
अहमदनगरचा सुलतान -निजामशाहा
विजापूरचा सुलतान - आदिलशाहा
प्रश्न ३ . वेगळा शब्द ओळखा
१ . स्वराज्य , गुलामगिरी , स्वातंत्र्य - गुलामगिरी
२ .रयत , प्रजा , राजा . - राजा
प्रश्न ४ .एका वाक्यात उत्तरे लिहा
१.प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा .
उत्तर - मुघल सम्राट अकबर , विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय अशा काही राजांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले .
२ . शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?
उत्तर - शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य हाती घेतले .
उत्तर - रयतेवर अन्याय करणाऱ्या आदिलशाही व मुघलशाही या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली .
४ . ' स्वराज्य ' म्हणजे काय ?
उत्तर -' स्वराज्य ' म्हणजे स्वतःचे राज्य .
५ .शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी कोणाच्या कामगिरीचा उपयोग
झाला ?
उत्तर - महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक संतांच्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला .