धरतीची आम्ही लेकरं
प्रश्न १ .कवितेच्या ओळी पूर्ण करा .
१)धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान ।
२) शेतावर जाऊया । सांगाती गाऊया ।
रानीवनी गाती जशी रानपाखरं ॥
३) शाळु ,जोंधळा मोती ।चमचम चमकत्याती ।
मोत्यांची साल भरी खाऊ भाकर ।
४)मेहनत जिमनीवरी । केली वरीसभरी ।
आज आला फळ त्याच्या डुले शिवार ।
प्रश्न २ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)कशाचे दाणे मोत्यांप्रमाणे चमकतात ?
उत्तर - ज्वारीचे दाणे मोत्यांप्रमाणे चमकतात .
२)शेतात आनंदाने काय डोलत आहे ?
उत्तर - शेतात आनंदाने पीक डोलत आहे .
३)कवीने कोणाची लेकरे आहोत असे म्हटले आहे ?
उत्तर - कवीने मातीची भाग्यवान लेकरे आहोत असे म्हटले आहे .
४ )वर्षभर कोठे कष्ट केले आहे ?
उत्तर -वर्षभर शेतात कष्ट केले आहे .
प्रश्न ३ .पुढील शब्दांचा समानार्थी शब्द सांगा .
१)लेकरे - मुले
२)शिवार - शेत ,रान
३)धनी - मालक
४)धरती - जमीन