एक अपूर्व सोहळा
प्रश्न१ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
१) शिवरायांनी नव्या राजधानीसा रायगडाची निवड केली .
२) शिवरायांचा राज्याभिषेक १६७४ मध्ये झाला .
३) गागाभट्टाचे घराणे मूळ पैठणचे होते .
४) राज्याभिषेक सोहळ्यासाठी .. इंग्रजांनी ऑक्झिंडेन हा आपला वकील नजराणा देऊन पाठवला होता .
प्रश्न२) एका वाक्यात उत्तरे लिहा
१) सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते ?
उत्तर -सोन्याच्या घागरीत गंगा , सिंधू , यमुना, गोदावरी , कृष्णा , नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे पाणी भरलेले होते .
२) शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला ?
उत्तर - शिवरायांनी राज्याभिषेकापासून ' राज्याभिषेक शक ' सुरू केला .
३) राज्याभिषेकप्रसंगी बसवलेले सिंहासन कसे होते ?
उत्तर - राज्याभिषेकप्रसंगी बनवण्यात आलेले सिंहासन सोन्याचे , मौल्यवान रत्नांनी जडलेले आणि त्यावर शुभ्र छत्र बसवलेले असे होते.
४) सिंहासनाजवळ कोण बसले होते ?
उत्तर -सिंहासनाजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले होते .
५) गागाभट्टांनी शिवरायांचा कोणत्या शब्दांत जयजयकार केला ?
उत्तर - गागाभट्टांनी शिवरायांचा , " क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो , " या शब्दांत जयजयकार केला .
प्रश्न३) पुढील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा
१) शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले ?
उत्तर - मराठयांच्या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता दयावी . अनेक वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा , प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला , असे स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे आणि हे स्वराज्य भक्कम करावेया हेतूंनी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले .
२) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली ?
उत्तर - रायगड हा मजबूत किल्ला होता . रायगडावरूनस्वराज्याचा कारभार करणे सोपे होते . तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोईचे होते ;म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली .
३) मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का वाहू लागले ?
उत्तर - राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या तीस वर्षांच्या कष्टांचे चीज झाले होते . शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वराज्यस्थापनेचे स्वप्न आज साकार झाले होते म्हणून मासाहेबांचा आनंद अश्रूंवाटे बाहेर पडला .