साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा
मला शिकायचंय
 प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)स्नेहा का रडत होती ?
उत्तर - स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते म्हणून नेहा रडत होती .

२)सरपंचांनी बबलीचा कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ?
उत्तर - सरपंचांनी बबलीला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता .

३)मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले ?
उत्तर - स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत हे बबली कडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले म्हणून ते सखारामच्या घरी गेले .

४)स्नेहा अतिशय आनंद का झाला ?
उत्तर -स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला .


प्रश्न २ .तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा .

१)मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले ?
उत्तर - तुमची लेक हुशार आहे .तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा .  स्वावलंबी बनवू द्या .असे मुख्याध्यापक सखाराम म्हणाले .

२)सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले ?
उत्तर - तुझी मुलगी माझ्या मुली एवढीच आहे
मी तिला पाचवी इयत्तेत पाठवणार आहे आडगाव ची शाळा इथून फक्त अर्धा तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही एसटीतून जाईल .

३)स्नेहाची आई चिंतेत का पडली ?
उत्तर - शेतातून घरी परत आल्यावर स्नेहाच्या आईने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती .रडून रडून तिचे डोळे सुजले होते म्हणून तिची आई चिंतेत पडली .

४)सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला ?
उत्तर -स्नेहा चे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवस-रात्र कष्ट करेन पण माझ्या मुलीला मी शिकवेनच असा निर्णय घेतला .


प्रश्न ३ .पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा .

१)चिंतेत पडणे - काळजीत पडणे .
वाक्य - आपल्या मुलीला आजारी असलेली पाहून राधा बाई चिंतेंत पडल्या .

२)गहिवरून येणे - मन दाटून येणे .
वाक्य - सीमाला माहेरून परत सासरी जाताना गहिवरून आले .

३)डोळे पाणावणे - डोळ्यांत अश्रू दाटणे .
वाक्य -पहिल्या दिवशी शाळेत जाताना सोहम चे डोळे पाणावले .

४)अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे .
वाक्य - छोट्याशा सोनूला पोहताना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले .

५)पोटतिडकीने बोलणे -  मनापासून कळकळीने बोलणे .
वाक्य - किसनराव आपल्या मुलांना शेती विषयी सांगताना पोटतिडकीने सांगू लागले .

६)रक्ताचे पाणी करणे - अतिशय कष्ट करणे .
वाक्य - सुभानरावांनीं रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवले .

प्रश्न ४ .तुम्हांला काय वाटेल ते लिहा .
१)खूप पुस्तक पाहून -
उत्तर - खूप पुस्तकं  पाहून गोष्टीची पुस्तकं  वाचावीशी वाटतात .

२)बाजारात फिरताना -
उत्तर - बाजारात फिरताना फुगे , खाऊ घ्यावासा वाटतो .

३)कुणी आजारी असेल तर -
उत्तर -कुणी आजारी असेल तर त्याला मदत करावीशी वाटते .

४)झोपेत असताना कुणी हाका मारल्या -
उत्तर -झोप मोडली म्हणून राग येतो चिडचिड होते .

  

Post a Comment

Previous Post Next Post