साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

शायिस्ताखानाची फजिती 


प्रश्न१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

१)शायिस्ताखानाने           पुरंदर    किल्ल्याला वेढा दिला .

२)शायिस्ताखानाने पुण्यात             लाल महालात               मुक्काम ठोकला .

३) औरंगजेब बादशाहाने शायिस्ताखानाची       बंगालमध्ये             रवानगी केली .

४) पुण्याकडे येताना शायिस्ताखानाने प्रथम             चाकणचा             किल्ला जिंकून घेतला .

५ ) शायिस्ताखानाची फजिती हा           मुघल       सत्तेला बसलेला पहिला जबरदस्त तडाखा होता

प्रश्न २) एका वाक्यात उत्तरे लिहा .

१) शायिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले ?
उत्तर - मराठयांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले .

२) शायिस्ताखान कोणती गावे घेत पुण्यात आला ?
उत्तर - शायिस्ताखान शिरवळ , सासवड ,चाकण ,शिवापूर अशी गावे घेत पुण्याला आला .

३) शायिस्ताखानाला कोणती भीती वाटू लागली ?
उत्तर -' आज आपली बोटे तुटली ;उदया आपले शीर शिवाजी कापून नेईल , ' अशी शायिस्ताखानाला भीती वाटू लागली .

४) शायिस्ताखानाने फिरंगोजी नरसाळ्याला कोणते आमिष दाखवले ?
उत्तर - शायिस्ताखानाने फिरंगोजी नरसाळ्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले .

५) आदिलशाहाने शिवरायांशी तह केल्यामुळे कोणता फायदा झाला ?
उत्तर -आदिलशाहाने शिवरायांसी तह केल्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित
 झाली .

प्रश्न ३) दोन ते तीन वाक्यांत कारणे लिहा .
१) औरंगजेब बादशाहा शिवरायांवर चिडला .
उत्तर - आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले . त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या ;त्यामुळे मुघल  बादशाहा औरंगजेब शिवरायांवर चिडला .

२) शायिस्ताखान खिडकीवाटे पळू लागला .
उत्तर - युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी तलवार उपसलेली पाहून शायिस्ताखानघाबरला व ओरडत खिडकीवाटे पळू लागला .
 

Post a Comment

Previous Post Next Post