स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त
प्रश्न १.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
१.भोरप्या डोंगरावर शिवरायांनी प्रतापगड हा किल्ला बांधला .
२.खंडोजी आणि बाजी घोरपडे यांनी कोंढाणा भागात धुमाकूळ माजवला .
३.मोरे हे जावळीचे जहागीरदार होते .
४.जावळीच्या विजयाने रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला .
५.शिवराय कर्तव्यापुढे नातेगोते मानत नसत.
प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा.
१.जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने कोणता किताब दिला होता ?
उत्तर - जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने 'चंद्रराव ' हा किताब दिला होता .
२.जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता ?
उत्तर - जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता; कारण या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पुर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला .
३.शिवरायांच्या स्वराज्याला कोणते सरदार विरोध करीत होते ?
उत्तर - शिवरायांच्या स्वराज्याला निंबाळकर घोरपडे , मोरे इत्यादी सरदार विरोध करीत होते .
४.आदिलशाहाने आपल्या चाकरीतील कोणत्या सरदारांना शिवरायांविरुद्ध चिथावले ?
उत्तर - आदिलशाहाने आपल्या चाकरीतील खंडोजी आणि बाजी घोरपडे या सरदारांना शिवरायाविरूद्ध चिथावले.
५.मोऱ्यांची जहागीर कोठून कोठपर्यत होती ?
उत्तर - मोऱ्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती .
प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
१.जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे ?
उत्तर - जावळीचे जंगल इतके दाट होते , की भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता . या जंगलात वाघ , लांडगे , अस्वले इत्यादी श्वापदे संचार करीत.मोऱ्यांची जावळी जणू वाघाची जाळीच होती;त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे .
२ .शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले ?
उत्तर - स्वराज्याच्या मुलखावर स्वाऱ्या करणाऱ्या यशवंतराव मोरे याला शिवरायांनी पत्र धाडले की ," तुम्ही राजे म्हणाविता,राजे आम्ही . आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधल आहे , तर तुम्ही राजे न म्हणावे . "
३.यशवंतराव मोरे याने शिवरायांना कोणत्या गोष्टी देण्याचे कबूल केले ?
उत्तर - जावळीच्या गादीवर बसवण्यात शिवरायांनी केलेल्या मदतीच्या बदल्यात यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले.तसेच शिवरायांच्या कार्यात मदत करण्याचेही
कबूल केले .