स्वराज्याचे तोरण बांधले
१.शिवरायांकडे पुणे , सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर
होती .
२.शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे,असे ठरवले .
३.स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली.
४.शिवरायांनी तोरणा किल्ल्याल प्रचंडगड हे नाव दिले .
५.शिवरायांच्या जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते .
६.मुरुंबदेवाच्या किल्ल्याला शिवरायांनी राजगड हे नाव दिले .
प्रश्न २.एका वाक्यात उत्तरे लिहा
१.महाराष्ट्रात कोणत्या चार सत्ता हुकमत गाजवत होत्या ?
उत्तर - महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान , गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता हुकमत गाजवत होत्या .
२.शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या?
उत्तर - शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस , प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या .
३.शिवरायांनी आदिलशाहाला कोणते उत्तर पाठवले ?
उत्तर - शिवरायांनी आदिलशाहाला उत्तर पाठवले की, ' जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा ;म्हणून आम्ही किल्ला घेतला तो आदिलशाहाच्या हितासाठीच , यात दुसरा काहीही हेतू नाही . '
४.तोरणा किल्ल्याला ' तोरणा ' हे नाव का पडले ?
उत्तर - तोरणा किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे, त्यावरून या किल्ल्याला
'तोरणा ' हे नाव पडले .
५.राजगडानंतर शिवरायांनी कोणते किल्ले ताब्यात घेतले?
उत्तर - राजगडानंतर शिवरायांनी कोंढाणा , पुरंदर व रोहिडा हे किल्ले ताब्यात घेतले .
प्रश्न ३.दोन ते तीन वाक्यांत कारणे लिहा .
१.स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली .
उत्तर - तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंडअसा डोंगरी किल्ला होता .आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते . किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारूगोळाही नव्हता;म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली .
२.तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या .
उत्तर - तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या . ' शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे , तिनेच हे धन दिले,अशी कामगारांची भावना झाली.स्वराज्याचे ते धन होते , या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठया आनंदाने आणून दिल्या .