वस्त्र
प्रश्न१ .रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा१ ) पूर्वी कापसापासून शोध करण्यासाठी चरखा वापरत असत
२ ) जुने कपडे चांगले असतील तर ते आपण गरजवंताला देऊ शकतो
३ )कपडे वापरल्यावर अस्वच्छ होतात
प्रश्न २. पुढील तक्त्यात दिलेली शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या
उत्तर- 1 ) मेंढी - लोकर - स्वेटर
2 ) कापूस - सुती - कापड
3 )ताग - धागा - पोते
प्रश्न ३ चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात.
उत्तर - साबण व डिटर्जंट पावडर कपडे धुण्यासाठी वापरतात
प्रश्न ४ . कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते कल्हईवाला, बोहारीण, कासार.
उत्तर - बोहारीण आपल्याजवळील जुने कपडे घेतले आणि आपल्याला त्याबदल्यात भांडी देते
प्रश्न ५ अर्जुनच्या अंगाला खूप खाज येत आहे त्याने काय करायला हवे योग्य गट शोधा
( अ ) स्वच्छ आंघोळ करणे अत्तर लावणे कपडे बदलणे
(ब )स्वच्छ आंघोळ करणे कपडे बदलणे राख लावणे
( क )स्वच्छ आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे औषधोपचार करणे
उत्तर - ( क )स्वच्छ आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे औषधोपचार करणे.
प्रश्न ६ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा
१ ) हवामानानुसार कपड्यांमध्ये कोणते बदल आपण करतो चार वाक्य लिहा
उत्तर - जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा आपण सुती कपडे वापरतो . हिवाळ्यात लोकरीचे कपडे, स्वेटर, मफलर, कानटोपी इत्यादी वापरतो. जेव्हा पाऊस असतो म्हणजे पावसाळा तेव्हा रेनकोट छत्री यांसारख्या गोष्टी आपण पावसापासून वाचण्यासाठी वापरतो. उन्हाळ्यामध्ये आपण हलक्या रंगाचे कपडे वापरतो.
2 ) मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते असा कोणता प्राणी आहे ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येते
उत्तर - आपल्याला तलम कापड रेशीम धाग्यापासून मिळते. रेशीम धागा हा आपल्याला रेशीम किडा पासून मिळतो . जेव्हा रेशीम किडा हा कोशामध्ये असतो ,तेव्हा त्यापासून रेशीम धागा काढला जातो व रेशीम कापड बनवले किंवा तलम कापड बनवले जाते.
३ ) आपले कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे आहेत ते सांगा
उत्तर - आपल्याला घाम येतो आणि घामामुळे आपले कपडे अस्वच्छ होतात. आपण मैदानावर खेळताना पडतो ,खेळत असताना मातीची धूळ उडते. आपण जेवताना आपल्या अंगावर भाजी सांडते , तेव्हा आपले कपडे खराब होतात त्यासोबतच आपण शाळेत किंवा इतरत्र जाताना रस्त्यावरची धूळ आपल्या अंगावर वर हवेमुळे उडते तेव्हा आपले कपडे स्वच्छ होतात.
४ ) कपडे कोणकोणत्या प्रकारे विणले जाते?
उत्तर - हातमाग व यंत्रमाग यांच्या साह्याने कापड विणले जाते, त्यासोबतच स्वेटर. कानटोपी, मोजे हे मोठ्या सुयांच्या मदतीने विणतात.
५ )भारत देशात विविधता कशी दिसते व कोठे कोठे असते?
उत्तर - हवामानानुसार सण-उत्सव , समारंभ, भौगोलिक वातावरण हे भारतामध्ये वेगवेगळे आहे आणि त्यानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पोशाख पहायला मिळतो.