उत्तर:-
गांधीजींचे मित्र एकदा त्यांना भेटायला आले. दोघांनी गप्पागोष्टी केल्या. गांधीजींचे लक्ष मित्राच्या धोतराकडे
गेले. ते मित्राला
म्हणाले, “अरे, इतका श्रीमंत झालास, पण तुझे
धोतर फाटकेच!” मित्र म्हणाला, “अरे भाई, श्रीमंतालाही काही अडचणी असतात.” गांधीजी
म्हणाले, “फाटके धोतर नेसण्याइतकी काय अडचण आली?” मित्र म्हणाला, “नोकर काम करीत नाहीत .” हे ऐकून गांधीजीने लगेच त्याचे धोतर शिवून दिले.
हे पाहून तो श्रीमंत गृहस्थ गांधीजींना काय सांगायचे आहे, ते समजून गेला.