मी फुलपाखरू बोलतोय !
काय कसं काय मित्रा कसे आहात? मला ओळखलस का मी कोण आहे? मी तेच
रानात फुलांवर उडणारे , रंगीबिरंगी पंख असणारे, तुम्हाला माहित नाही का, “धरु नका ही बरे फुलावर उडती बरोबर फुलपाखरे” ओळखलं तर तुम्ही.. आज किती छान वारा सुटला आहे, सकाळ छान आहे , सगळं काही सुंदर वातावरण आहे , पण मी मात्र खाली जमिनीवर पडलोय , मी आज पर्यंतउडत होतो परंतु इथून पुढे मला उडता येणार नाही कारण माझा एक पंख तोडलाय !....
सकाळी उठलो होतो . छान हवेत भरारी घेतली. या फुलावरून त्या फुलावर लाल,
पिवळी, गुलाबी, नारंगी , सफेद , मोठे फुल छोटे फुल, कितीतरी फुलांना मी आज पाहिली .
उडत उडत या बागेत आलो छान . छान फुलं आहेत मोठमोठाले झाडे आहेत सगळ्यांची नीट
व्यवस्थित होते . या बागेत लहान लहान मुले होती त्यांची नजर माझ्यावर पडली .मी जीव वाचवत
उडू लागलो ,पण क्षणात मला पकडले दोन्ही हातात आणि खेळू लागली माझ्याबरोबर .
एक जण म्हणाला या फुलपाखराच्या पायाला दोरा बांधू, दुसरा म्हणाला या
फुलपाखराच्या पंखाचे रंग किती छान आहेत मला रंग पाहिजे मी थोडे रंग काढू का? अरे
काय चाललंय? जनावरासारखे मला बांधून ठेवणार? ज्याच्या मदतीने उडू शकतो ती पण
काढून घेणार का ? मला हात लावायला गेली आणि माझा पंख निघून आला. तेव्हापासून
मी जमिनीवर आहे , उडण्याचा प्रयत्न करतोय पण मला उडता येत नाही .
पृथ्वीवर जसा तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे तसा आम्हाला पण आहे. इतरांसारखे
आम्ही पण या निसर्गाचे घटक आहोत. आमच आयुष्य कस आहे , तुम्हाला माहिती आहे का ?
एखाद्या झाडाच्या पानावर आम्ही अंडी घालतो. काही दिवसांनी ते अंड्यातून अळी बाहेर पडते .
त्या झाडाची पाने खाऊ लागते. हळूहळू अळी मोठी होत जाते. अळी मोठी झाल्यानंतर तिला
सुरवंट म्हणतात . सुरवंट पुढे स्वतः भोवती कोश गुंडाळून घेतो त्याला कोषावस्था म्हणतात.
आणि काही दिवस या कोशात माझ्यात खूप काही बदल होतात . मी कोशातून बाहेर येतो.
मला छान पंख असतात. वेगळ्यावेगळ्या रंगाचे पंख असतात . आम्ही पुन्हा नवीन झाडावर
अंडी , अळी, कोश आणि फुलपाखरू असा आमचा जीवनक्रम चालू असतो. आमचे आयुष्य
खूप छोटे आहे. आम्हालापण जगण्याचा आनंद घेऊ द्या.
मित्रांनो निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी निसर्गातल्या सर्व गोष्टी व्यवस्थित
चालण्यासाठी प्रत्येक सजीव आवश्यक आहे . यातील सजीव नष्ट होत चालले, त्यांची काळजी
घेतली नाही गेली तर निसर्गचक्र व्यवस्थित चालणार नाही . त्यामुळे सर्वांबरोबर
माझी पण काळजी घ्या . माझ्या पंखांना हात नका लावू , मला पकडू नका ,
माझ्यामागे धावू नका . हवेतर दुरून माझा फोटो काढा. माझ्याबद्दलची पुस्तके वाचा …..