साप्ताहिक चाचणी Weekly Test

साप्ताहिक चाचणी Weekly Test उपलब्ध आहे. Download करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा

 


वाचन करा :-

                                         मी नदी  बोलतेय .


               मी नदी बोलतेय आहे. होय , मी तीच नदी पावसाळ्यात पूर येणारी ,तुम्हा सर्वांची तहान भागविणारी , पर्वत ते समुद्र प्रवास करणारी . आज पाहाल तर मला कधीच पूर येत नाही , कोणीही माझे पाणी पिण्यास घेत नाही , कितीतरी बंधाऱ्यामुळे  मी कोठे सुरु होते अन कोठे संपते हे मलाच माहित नाही , तुम्ही माझ्याजवळ आल्यास नाकाला रुमाल लावता , छी ! किती घाण असे म्हणता .
               माझा इतका राग येत असेल तर..... तुम्हीच सांगा माझी ही अवस्था कोणी केली .......कोण आहे ? माझ्या या अवस्थेला कारणीभूत .आजवर कितीतरी घाण तुमचा  कपड्याचा साबण , जनावरांचे धुणे , कार्यक्रमाचे निर्माल्य , सकाळी कडेने करता ती घाण ,अशाप्रकारे खूप  मी माझ्या पोटात घेत होते पण आता तर हद्दच झाली ..........

          संपूर्ण शहराचे गटार तुम्ही माझ्यात मिसळता , साखर कारखान्याच्या मोठा पाईप माझ्यात आणून सोडला आहे , रासायनिक  कारखान्यांचे दूषित पाणी जे विषापेक्षाही घातक आहे, तेही नदीतच .............

अरे , तुम्हाला माहित नाही का ? माझ्यात कितीतरी प्राणी राहतात , त्यांचे काय होत असेल , माझे पाणी तुम्ही शेताला देता पाण्यातील विष तुमच्याच पिकातून तुम्हालाच मिळत आहे ...................( पुढील ओळी तुमच्या मनाने लिहा व आत्मकथन पूर्ण करा. )

Post a Comment

Previous Post Next Post