Setu abhyas PDF 2022-23 setu abhyaskram 2022 सेतू अभ्यासक्रम pdf download
Punarchit Setu abhyas 2022-23
सन २०२२-२३ मध्ये BridgeCourse 202१ -2२ प्रमाणेच महाराष्ट्रातील इयत्ता दुसरी ते दहावीच्या मुलांसाठी सर्वच पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. सन २०२१ मध्ये १ जुलै ते १४ ऑगस्ट या ४५ दिवसांत सेतु अभ्यास( setu abhyas ) सुरू होता. दर १५ दिवसांनी तीन मूल्यमापन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोना काळातील मुलांच्या भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमधील प्रगती कमी दिसून आली . यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांची शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी इयत्तानिहाय आणि विषयनिहाय पुन्हा पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ राबवण्यात येणार आहे.
कसे आहे पुनर्रचित सेतू अभ्यास Setu abhyas 2022-23 चे स्वरूप ?
१. 1. इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
2. सेतू अभ्यास हा मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी तयार करण्यात आलेला आहे.
3. सेतू अभ्यास Setu abhyas हा मागील इयत्तांच्या क्षमतांवर आधारित आहे.
4. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३०(शालेय कामकाजाचे दिवस) दिवसांचा आहे .
5. दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) आहेत.
6. मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी सेतू अभ्यास Setu abhyas तयार करण्यात आलेला आहे.
7. पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत.
8. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीकृती करायच्या आहेत.
9. सेतू अभ्यासातील Setu abhyas कृतीपत्रिकांचे विषयनिहाय दिवसनिहाय नियोजन आहे .
कशी आहे सेतू अभ्यासाची अंमलबजावणी ?
१. सदर सेतू अभ्यास Setu abhyas सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
२. सदर सेतू अभ्यासाला Setu abhyas सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पूर्व चावणीतील गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची Setu abhyas अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.
४. सदर कृतीपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.
५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.
६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चावणी घेण्यात यावी उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या बावणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
७ सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
सेतू अभ्यास ३० दिवसांचा
सेतू अभ्यास Setu abhyas दिवसनिहाय कृतीपत्रिका worksheets मिळविण्यासाठी त्या वर्गाच्या समोरच्या बटनवर क्लिक करून प्रत्येक दिवसाचा सेतु अभ्यास Setu abhyas डाऊनलोड करू शकता.
सेतू अभ्यास Setu abhyas 2022-23
इयत्तानिहाय मिळवा pdf download
अ.क्र | इयत्ता | लिंक |
1 | इयत्ता 1 ली | |
2 | इयत्ता २ री | |
3 | इयत्ता ३ री | |
4 | इयत्ता ४ थी | |
5 | इयत्ता ५ वी | |
6 | इयत्ता ६ वी | |
7 | इयत्ता ७ वी | |
8 | इयत्ता ८ वी | |
9 | इयत्ता ९ वी | क्लिक करा |
10 | इयत्ता १० वी | क्लिक करा |
सेतू अभ्यास Setu abhyas 2022-23
चाचणी इयत्तानिहाय गुणसंकलन तक्ते pdf download
अ.क्र | इयत्ता | लिंक |
1 | इयत्ता २ री | |
2 | इयत्ता ३ री | |
3 | इयत्ता ४ थी | |
4 | इयत्ता ५ वी | |
5 | इयत्ता ६ वी | |
6 | इयत्ता ७ वी | |
7 | इयत्ता ८ वी | |
8 | इयत्ता ९ वी | क्लिक करा |
9 | इयत्ता १० वी | क्लिक करा |